Ad will apear here
Next
वीस रुपयांच्या नव्या नोटा चलनात दाखल
लक्ष्मीपूजनासाठी नव्या नोटा घेण्याकरिता नागरिकांची गर्दी


नाशिक :
देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक रोड येथील नोट प्रेसमध्ये सध्या २० रुपयांच्या नोटांच्या छपाईचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वीस रुपयांच्या नव्या नोटा ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्या असून, दीपावलीत लक्ष्मीपूजनासाठी या नोटा नेण्याकरिता ग्राहकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. 

स्टेट बँकेच्या नाशिक रोड येथील दुर्गा उद्यानासमोरील शाखेत ग्राहक, खातेदारांना जुन्या नोटा देऊन नवीन नोटा घेता येतील. काही हौशी ग्राहकांनी या शाखेतून वीसच्या नवीन नोटांचे बंडल घेतले आहे. नव्या नोटांचे लक्ष्मीपूजन करण्यासाठी महिला, नोकरदार वर्ग आणि व्यावसायिक सध्या या नोटा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे स्टेट बँकेत गर्दी दिसत आहे. 

नाशिक रोड येथील प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे रुपयांच्या चलनी नोटांची छपाई होते. छापल्यानंतर त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवल्या जातात. तेथून त्या स्टेट बँकेमार्फत देशभरात वितरित होतात. वीस रुपयांच्या नव्या चलनी नोटा वेळेत छापण्याचे आव्हान प्रेस कामगारांनी पूर्ण केल्यामुळे त्यांच्यामध्येही समाधानाचे वातावरण आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWHCF
Similar Posts
रोटरी क्लब नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर देणार भर नाशिक : ‘समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या रोटरीचे कार्य विश्वव्यापी होत असून, त्यासाठी अधिकाधिक सदस्य नोंदणी करणे ही बाब क्रमप्राप्त आहे. नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर रोटरीने आपले लक्ष केंद्रित केले असून, नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांना पाणीटंचाई बाराही महिने भासणार नाही, यासाठी रोटरी क्लब धडपडत आहे.
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
नाशिक कारागृहात कम्प्युटर लॅब; ही सुविधा असलेले देशातील पहिले कारागृह नाशिक : साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक जिथे लिहिले, त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. कम्प्युटर लॅब सुरू करणारे हे देशातील पहिलेच कारागृह ठरले आहे. मुंबईच्या समता फाउंडेशनच्या सहकार्याने ही लॅब सुरू झाली असून, कैद्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाणार असल्याची
अनाथ, दृष्टिहीन दाम्पत्याच्या विवाहाला आसरा फाउंडेशनचा मदतीचा हात नाशिक : मुला-मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे विवाह जुळवण्याच्या प्रक्रियेमध्ये अलीकडे अनंत अडचणी निर्माण होत आहेत. मुलगा किंवा मुलगी शारीरिक विकलांग असेल, तर अडचणींमध्ये आणखीच वाढ होत जाते. या पार्श्वभूमीवर, नाशिकमध्ये नुकताच झालेला सुरेश पाटील आणि रत्ना पांगारे या अनाथ, दृष्टिहीन दाम्पत्याचा विवाह वेगळा ठरावा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language